दहा दिवसांपासून बेपत्ता कंत्राटदाराचा चेंबरमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दहा दिवसांपासून बेपत्ता झालेले गोलटगाव येथील ५१ वर्षीय लेबर कंत्राटदार इंद्रजीत बाबूराव खुळे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (दि. ३) दुपारी करमाड एमआयडीसी परिसरात आढळून आला. एका नवीन कंपनीचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील रस्त्यालगतच्या चेंबरमध्ये हा मृतदेह निष्पन्न झाल्याने एमआयडीसी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास चक्रांना गती दिली आहे.
याप्रकरणी खुळे बेपत्ता
झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी अपहरणाची तक्रार दिली होती. आता मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. २३ ऑक्टोबर रोजी ते बेपत्ता झाले होते. त्यांचा मोबाईलही बंद होता. गेल्या दहा दिवसांपासून नातेवाइकांकडून विविध ठिकाणी त्यांचा शोध सुरू होता. त्यांचे पुतणे विशाल भास्कर खुळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान,
मंगळवारी करमाड एमआयडीसी परिसरात एका शेतकऱ्याला चेंबरमधून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. संशय आल्याने त्याने चेंबरमध्ये डोकावून पाहिले असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती अवस्था दिली. मृतदेहाची पाहता फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविला. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख इंद्रजीत खुळे अशी पटली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions